‘सिटी वेस्ट टू सिटी बस’ उपक्रमास सुरुवात; बायोसीएनजीवर पीएमपीएमएलच्या दोन गाड्या धावणार

247 0

पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ओल्या कचऱ्यापासून इंधन निर्मीतीचा प्रकल्प सुस रस्ता येथे उभारण्यात आला आहे.ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक बायोसीएनजीवर पीएमपीएमएलच्या दोन गाड्या धावणार आहेत.

‘सिटी वेस्ट टू सिटी बस’ या उपक्रमाअंतर्गत निगडी ते लोणावळा या मार्गावर या गाड्या धावणार आहेत.या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या सीबीजी इंधनापासून पीएमपीएमएलच्या गाड्या चालवण्याचं नियोजन होतं.त्यानुसार या उपक्रमाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार ,रवींद्र बिनवडे यांच्यासह पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या उपस्थित प्रारंभ झाला.टप्प्याटप्प्याने दैनंदिन सुमारे १०० गाड्या बायोसीएनजीवर धावतील असा दावा पीएमपीएमएल व महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.बायोसीएनजीवर धावणाऱ्या गाड्यांची चाचणी टाटा मोटर्स, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन इंडिया, व्हेईकल ॲन्ड रिसर्च डेव्हलमेंट एस्टॅब्लिशमेंट यांनी केली आहे. सध्या निगडी ते लोणावळा या मार्गावर दोन गाड्या धावणार आहेत. पीएमपी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, मे. नोबेल एक्स्चेंज यांच्या संयुक्त विद्यमानाने सिटी वेस्ट टू सिटी बस हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!