सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह, बैठकीत सहभागी अनेक नेत्यांनाही लागण

355 0

नवी दिल्ली- सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. रणदीप सुरजेवाला यांनी असेही सांगितले की, यापूर्वी सोनिया गांधी ज्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटल्या होत्या त्यापैकी अनेकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी यांना काल (बुधवार) संध्याकाळी सौम्य ताप आला होता, त्यानंतर त्या कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आल्या.

सुरजेवाला म्हणाले की, सोनिया गांधींनी सध्या स्वत:ला विलगीकृत केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक आहे. 8 जूनपूर्वी सोनिया गांधी बऱ्या होतील अशी आशा सुरजेवाला यांनी व्यक्त केली.

8 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात ही चौकशी होणार आहे. सुरजेवाला म्हणाले की, सोनिया गांधी दोन-तीन दिवसांत बरे होण्याची अपेक्षा आहे.

 

Share This News
error: Content is protected !!