आमदार गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ‘ही’ मागणी

228 0

सांगली – भाजपचे आमदार पडळकर यांनी अहमदनगरच्या नामांतरासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. अहमदनगरचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे.

या पत्रात पडळकर यांनी म्हटले आहे की, अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखण्यात आलं. मुंबई बॅाम्ब ब्लास्टमध्ये शेकडो हिंदूचे जीव गेले. या बॅाम्ब ब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीम याच्या बहिणीसोबत मंत्री नवाब मलिक यांनी आर्थिक भागीदारी केली. मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीने पोलीस बळाचा गैरवापर केला. हिंदू राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती म्हणजे पवार यांच्या नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट त्यांना वाटतो.

हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत जेव्हा हिंदू संस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती. त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी यांनी या हिंदू संस्कृतीत प्राण फुकले. त्यांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’चे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नाही. स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकरशाहीचा सम्मान कराल अशी अपेक्षा आहे. बहुजन समाज जागा झाला आहे आणि संघटीत झालाय, हे ध्यानात ठेवा, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात दिला आहे.

 

Share This News

Related Post

लहान मुलांचे ‘बोरंनहाण’ म्हणजे काय ? कोणत्या वस्तूंचा करावा उपयोग , केव्हा करावे ;वाचा काय आहे महत्व..

Posted by - January 16, 2023 0
बोरंनहाण हा शिशुसंस्कार बहुतांश लोकांना परिचित आहे. लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे. मकर संक्रांति पासून ते रथसप्तमी पर्यंतमुलांना बोरंनहाण…

पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यांध्य व धार्मिक विचार थांबवा !: नाना पटोले

Posted by - May 1, 2022 0
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला…

महत्वाची बातमी : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 31.74% मतदान; मतमोजणी 6 नोव्हेंबरला

Posted by - November 3, 2022 0
मुंबई : बहुचर्चित महाराष्ट्र विधानसभेच्या 166 अंधेरी पूर्व पोट निवडणूक आज पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार श्रीमती ऋतुजा…

‘हा कार्यकर्त्यांसाठी वस्तुपाठ’; राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांसाठी खास पत्र

Posted by - July 1, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास पत्र लिहिलं आहे. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *