रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक

471 0

अहमदनगर – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणार्यास अटक करण्यात आली आहे. त्याला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

भाऊसाहेब शिंदे असे धमकी देणाऱ्या व्यक्तीने नाव असून तो मूळचा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. धमकी दिली त्यावेळी तो नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथे होता.

दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन नंबरवर सोमवारी दुपारी 3 वाजून पन्नास मिनिटांनी एका व्यक्तीने फोन केला होता. त्यामध्ये त्या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे नाव घेऊन त्यांना पुढील 72 तासात जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाने मुंबई येथील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क करून ही माहिती दिली. पोलिसांना माहिती कळताच तपासाची चक्रे फिरली.

ज्या नंबरवरून फोन आला त्या व्यक्तीशी संपर्क केला असता ती व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे समजले होते. त्यानंतर नगर जिल्ह्यातील पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला असता भाऊसाहेब शिंदे असे या व्यक्तीचे नाव असून तो नगर जवळील चिचोंडी पाटील या गावात असल्याचे समजले. पोलिसांनी त्वरित त्याला याब्यात घेऊन अटक केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!