Viral Video

Viral Video : विवाहित गर्लफ्रेंडचा ‘ड्रामा’; रागाच्या भरात 150 फूट टॉवरवर, मनधरणी करायला बॉयफ्रेंड गेला अन्…

692 0

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला शोले चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. मात्र याठिकाणी प्रियकर नाही तर प्रेयसी टॉवरवर चढल्याचे समोर आले आहे. यामध्ये छत्तीसगडमधील एका गावात प्रियकर-प्रेयसीचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रियकरावर चिडलेली प्रेयसी सुमारे 150 फूट उंच खांबावर चढली. कहर म्हणजे तिचे मन वळविण्यासाठी प्रियकरदेखील त्याच खांबावर चढला. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
अनिता भैना ही नवापूर गावातील महिला दोन दिवसांपासून कोडगर गावात मुकेश भैना याच्या घरी राहात होती. गुरुवारी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि चिडून अनिता घराबाहेरील विजेच्या टॉवरवर (Viral Video) चढली. मुकेश तिच्या मागे धावला, थांबविण्याचा प्रयत्नही केला; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर तोही तिच्यामागे टॉवरवर चढला. टॉवरवरच दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर दोघे एकत्र खाली उतरले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी (Viral Video) हजर झाले. त्यांनी दोघांना पोलिस ठाण्यात नेले आणि चौकशीनंतर अनिताला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. अनिता विवाहित असून, पतीपासून वेगळी राहते आणि मुकेशच्या प्रेमात असल्याचे समजत आहे. हा व्हिडिओ त्या ठिकाणी असलेल्या गर्दीतील कोणीतरी बनवला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Share This News
error: Content is protected !!