Viral Video

Viral Video : तिसरीत शिकणारा ‘हा’ पठ्ठ्या नक्कीच ‘महाराष्ट्र केसरी’ होणार

795 0

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात..आणि असाच एका गावातल्या शाळेतला तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. शाळेच्या मैदानावर या विद्यार्थ्यांचा कुस्ती सामना चांगलाच रंगात आलेला आहे. त्यामुळे छोट्या पहिलवानांची कुस्ती स्पर्धा सध्या चर्चेचा विषय आहे..

या व्हिडिओत आपल्याला दिसत आहे की तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये कुस्ती सामना सुरू आहे. आझाद घाडगे हा तिसरीतला पठ्ठ्या सगळ्या कुस्तीपटुंना चीतपट करत आहे. या छोट्या पहिलवानांचा रंगलेला कुस्ती सामना आणि शिक्षकांची सुरू असलेली कोमेंट्री यामुळे आपण खरच एखादा कुस्ती सामना पाहतोय की काय असाच अनुभव येतो. हा छोटा कुस्तीपटू आझाद घाडगे ज्या प्रमाणे कुस्तीचे डाव खेळतोय त्यावरून हा पठ्ठ्या मोठेपणी महाराष्ट्र केसरी होणार असच वाटतयं. प्रत्येक डाव जिंकल्यानंतर उडी मारून आपला आनंद व्यक्त करण्याची त्याची पद्धतही लक्ष वेधून घेत आहे. त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचं सुद्धा अतिशय कौतुक आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ज्या प्रमाणे रंगते, आजूबाजूला प्रेक्षकांचा आरडाओरड असतो, ग्रामीण बाजात कॉमेंट्री सुरू असते…कुस्तीचे एक एक डाव टाकले जातात, टाळ्यांचा कडकडाट असतो तसच वातावरण या शाळेच्या मैदानावर पाहायला मिळत आहे..छोट्या आझादचे कुस्तीतील नैपुण्य, त्याचा आत्मविश्वास तर कौतुकास्पद आहेच पण त्या शिक्षकांचं बोलण्याच कसबही वाखाणण्याजोग आहे. त्यांच्या बोलण्यामुळे त्या कुस्तीच्या सामन्याला एक वेगळीच रंगत आली आहे.

शाळेतल्या कुस्तीचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या मुलाचा आत्मविश्वास पाहून हा पुढे नक्कीच पहिलवान होईल असे वाटतं. शालेय वयापासूनच जर मुलांना मैदानी खेळाची सवय लावली, त्यांच्यात आवड निर्माण केली तर नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील, यात शंका नाही.

Share This News
error: Content is protected !!