Viral Video

Viral Video : 70 वर्षाच्या वृद्ध आजींनी टाळ हातात घेऊन धरला डीजेच्या तालावर ठेका

816 0

जळगाव : एकता शिंपी समाजा तर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 676 व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त जळगावातील सुभाष चौकातून भव्य शोभा यात्रेचे (Viral Video) आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत (Viral Video) शिंपी समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या शोभायात्रेत महिला देखील पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

विठुरायाच्या व नामदेव महाराजांच्या जयघोषात ही शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेतील पालखी रथ आणि नामदेव महाराजांच्या वेशभूषणे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे शिंपी समाज बांधवांच्या महिलांनी काष्टी पातळ व डोक्यावर फेटा घालून डीजेच्या तालावर भावगीत व भक्ती गीत लावत ठेका धरला. यावेळी 70 वर्षीय आजीबाईंनीही तरुणांना लाजवेल असे नृत्य सादर करून मिरवणुकीची शोभा वाढवली. सध्या या आजींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Share This News
error: Content is protected !!