Viral Video

Viral Video : मुसळधार पावसामुळे पूल गेला पाण्याखाली; Video आला समोर

390 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता जवळपास सगळीकडे मान्सूनचे आगमन झाले आहे. सध्या सोशल मीडियावर पावसाचे विविध व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहेत.अशाच एका पुलाचा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. यामध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे एक पूल पाण्याखाली गेल्याचे दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Nagpur News : देवदर्शन करुन घरी परतत असताना काळाचा घाला; 2 जणांचा मृत्यू

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे अनेक पूल कोसळले. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पावसाच्या पाण्याच्या अतिप्रचंड वेगामुळे पूल पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे.लोकप्रिय पर्यटन शहर कासोल येथे घेतलेल्या व्हिडिओमध्ये एक नदी ओसंडून वाहत आहे आणि पर्यटकांच्या गाड्या खाली वाहत असल्याचे दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील मणिकरण शहर ओलांडून पार्वती नदीत वाहणाऱ्या जोरदार प्रवाहाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Satara News : जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने 15 मिनिटांच्या अंतराने बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू

@shubhamtorres09 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 1 मिनिट 4 सेकंदांचा आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंटदेखील केली आहे. लोक पावसामुळे पूर आलेल्या ठिकाणचे चित्र पाहून भिती व्यक्त करत आहेत. अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ते, वाहने आणि घरे वाहून गेली आहेत.

Share This News
error: Content is protected !!