आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Romance Video)होताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये हे कपल वर्दळची रस्त्यावरुन धावत्या बाइकवर रोमान्स करत होते. विशेष म्हणजे हे कपल वर्दळीच्या ठिकाणी रोमान्स करत होते.
व्हिडिओ व्हायरल
राजस्थानमधील जयपूरमध्ये धावत्या बाइकवर कपलचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ जयपूरच्या सांगानेर भागातील असल्याचे समजत आहे. खरं हा व्हिडीओ नीट पाहिला तर तुम्हाला कळलं की या बाइकवर दोन तरुण आणि एक तरुण सवार आहे. या व्हिडीओमध्ये यांनी रस्ते वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केलं आहे. बाइकस्वार तरुणाने हेल्मेट घातलेलं दिसत नाही. तर त्यामागे एक तरुण बसला आहे आणि त्याच्यामागे एक तरुणी आहे.
kitne ka chalan hona chaiye?@jaipur_police pic.twitter.com/HVq0Ufiq9Z
— rajni singh (@imrajni_singh) September 15, 2023
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दिवसाढवळा रस्त्यावर कपलचा रोमान्स सुरु आहे. रस्त्यावर वाहनांची दोन्ही बाजूने ये जा सुरु असून वर्दळीचा रस्ता दिसतोय. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर म्हणजे X वरील rajni singh या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.