VIDEO : सोनपाखरू हरवलं ! एकेकाळी बालगोपाळांसाठी आकर्षण ठरलेली दुर्मीळ कीटक प्रजाती संकटात… पाहा

794 0

चंद्रपूर : साधारणत: पंधरा-वीस वर्षांपूर्वी सोनपाखरू हा बालकांचा सर्वाधिक आवडता मित्र ठरला होता मात्र बालकांसाठी विशेष आकर्षण ठरलेलं हे सोनपाखरू आता दिसेनासं झालंय. कधी काळी बालगोपालांचं विश्व व्यापून टाकलेलं हे सोनपाखरू आता दुर्मिळ झाल्यानं ही कीटक प्रजाती आता संकटात आलीये.

See the source image

एकेकाळी लहान मुलं अगदी आपल्या अंगाखांद्यावर सोनपाखराला खेळवायची. सोनपाखरांची रंगीबेरंगी अंडी जास्त कुणाकडं आहेत याची जणू पैज लागायची पण आता मोबाईल हाताळणाऱ्या चिमुकल्या हातांना सोनपाखराचा स्पर्श अनोळखी बनलाय. भारतातील अत्यंत सूंदर, आकर्षक किटकांपैकी एक म्हणजे सोनपाखरू. ग्रामीण भागात सोनपाखरू या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या कीटकाचं शास्त्रीय नाव ” इंडीयन ज्वेल बिटल” असं आहे. ही एक कीटक प्रजाती आहे.

See the source image

साधारणत: पंधरा-वीस वर्षांपूर्वी हे सोनपाखरू हमखास काटेरी झूडपावर सापडायचं. या कीटकाला पकडण्यासाठी मुलं धावत सुटायची. या कीटका इतकीच सुंदर त्याची अंडी सुंदर असायची. या कीटकाला मुलं आगपेटीत ठेवायची. झाडाझुडपांवर सहजपणे आढळणारं हे सोनपाखरू आता केवळ फोटोत पाहायला मिळणं हे आपलं आणि विशेषतः आजच्या मुलांचं दुर्दैवच ! पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे याबाबत काय म्हणतायत पाहूयात…

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide