नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एक मुलगा बिना हेल्मेट शिवाय गाडी चालताना दिसत आहे. त्याने हेल्मेट न घातल्यामुळे पोलिस नव्हे तर एक आई आपल्या मुलाची भर रस्त्यात धुलाई करताना दिसत आहे. आई आणि मुलाचा हा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, मुलाच्या हातात हेल्मेट आहे, पण त्याने ते घातले नव्हते. एवढ्यावरच आईला राग आला आणि तिने रागाने भररस्त्यात मुलाच्या 2-4 कानशिलात लगावल्या. तसेच तो मुलगा आपल्या आईला समजावताना दिसत आहे. तो म्हणत आहे कि जवळच जाणार होता म्हणून हेल्मेट (Helmet) घातलं नाही. तेव्हा आईने त्याला समजावले की ते आवश्यक आहे, कारण अपघातत कधी आणि कसा होईल याचा भरवसा नाही.
https://twitter.com/HasnaZarooriHai/status/1656630481037713409
आई मुलाचा हा व्हिडीओ @HasnaZarooriHai ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. आईने आपल्या मुलाला धडा शिकवत बाकी लोकांना मोठा संदेश दिला आहे. आईच्या या कृतीने सगळ्यांची मने जिंकली आहेत.