घरातली जेष्ठ लोकांच्या तोंडून तुम्ही अनेकदा ‘ऐकावं जनाचं करावं मनाचं’ हे वाक्य ऐकले असेल. याचा अर्थ असा कि सर्वांचं ऐका पण तुमच्या मनाला पटेल तेच करा. पण तरी देखील काही लोक मित्र-मंडळींच्या नादाला लागतात अन् नको ते करून बसतात. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ (Propose Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Propose Viral Video) होताना दिसत आहे. सध्या प्रपोज करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
Kalesh b/w Boy and a Girl (Dosto Ne Force kr dia tha ki Propose krde wo bhi tujhe like krti hai while Celebrating Friendship Day)😭😭👍 https://t.co/aXmDTR3nvF pic.twitter.com/BfPVHpow94
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 6, 2023
काय आहे व्हिडिओमध्ये?
जेव्हा एखादी व्यक्ती कोणाच्या तरी प्रेमात पडते तेव्हा तिला किंवा त्याला प्रपोज (Propose Viral Video) कसे करायचे, असे अनेक प्रश्न त्या व्यक्तीला पडतात. यामध्ये मित्रांची खूप मदत होते. अनेकजण सहसा मित्रांचाच सल्ला घेतात. मात्र हाच मित्रांचा सल्ला घेणं, मित्रांचं ऐकनं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. मित्रांनी सांगितलं जा तीला प्रपोज कर, तिला पण तू आवडतोस. मित्रांचं हे मस्करीतलं बोलणं त्यानं मनावर घेतलं आणि काल फ्रेंडशीप डे च्या दिवशी त्या तरुणीला प्रपोज केलं. मात्र त्यानंतर घडलं भलतंच. त्या तरुणीनं चक्क त्या तरुणाच्या कानाखाली लगावली, तसंच चपलेनेही मारायला निघाली होती.यावेळी या तरुणाची अवस्था घाबरून खराब झाली, यावेळी त्याच्याच मित्राने हे सगळे आपल्या मोबाईलमध्ये शूट केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले.
हा व्हिडीओ व्हायरल (Propose Viral Video) होताच लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाहीत. या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत अनेकांनी प्रपोज करणाऱ्या तरुणाची मज्जा घेतली आहे.