CRIME NEWS VIDEO : सांगली जिल्हा मध्यवर्ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून खून प्रकरणातील आरोपी पसार

447 0

सांगली : तासगाव येथील खून प्रकरणातील परप्रांतीय आरोपीने सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून पलायन केले. सदरची घटना ही रविवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सुनील ज्ञानू राठोड असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. तासगावातील के. के. नगर येथे घरात हरी पाटील याच्या डोक्यात काठीने व खो-याने मारहाण करून तसेच त्याचे गुप्तांग कापून राठोड पती-पत्नीने निर्घृण खून केला होता. त्याचे प्रेत तसेच दोन दिवस त्यांनी घरात ठेवले.

अधिक वाचा : TOP NEWS MARATHI : “घात झाला दिघे साहेब घात झाला !” खा. राजन विचारेंचं आनंद दिघेंना भावनिक पत्र व्हायरल (Video) 

तासगाव-निमणी रोडलगत असलेल्या विहरीमध्ये प्लॅस्टिकच्या कागदामध्ये बांधुन मृतदेह टाकून जेसीबी घेऊन पती-पत्नीने पुणे गाठले होते. या प्रकरणी पोलिसांनी सुनील ज्ञानेश्वर राठोड आणि पार्वती सुनील राठोड या दोघांना जेसीबीसह पुण्यातून अटक केली होती. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

यातील सुनील राठोड हा रविवार सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील भिंतीवरून उडी मारून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. पसार झालेल्या राठोड याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

अधिक वाचा : शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक 

Share This News
error: Content is protected !!