Police Pune

Sushma Andhare : ‘उठा उठा देवेंद्रजी… गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली’ सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या ‘त्या’ व्हिडिओने उडाली खळबळ

345 0

पुणे : ललित पाटीलप्रकरणी आधीच पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushama Andhare) ट्विट केलेल्या एका व्हिडिओने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये कैद्यांना घेऊन जाणारी गाडी अज्ञात स्थळी थांबवण्यात आल्याचं दिसतंय. त्यानंतर पोलिसांसमोरच कैद्यांशी संबंधीत काही व्यक्ती कैद्यांना पाकीटं देत असल्याचं दिसतंय. पोलिसांच्या कारभाराकडे बोट दाखवत सुषमा अंधारेंनी हा व्हिडीओ पुण्यातील असल्याचा दावा केलाय. हा व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय लिहिले ट्विटमध्ये?
“उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली पुन्हा एकदा गृहकात्याची अब्रू चव्हाट्यावर आली” म्हणत सुषमा अंधारे यांची फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हा व्हिडिओ पुण्यातील जेल रोडचा (Pune Jail Road) असून कारागृहात घेऊन जाणाऱ्या कैद्यांना पोलिसांनी पाकिटे वाटल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी पोलीस आणि गृह खात्यावर केला आहे.

सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही याअगोदरदेखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजपचा शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न असून शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत असा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. भाजप शिंदे गटाला संपवत असून हा देवेंद्र फडणवीस यांचा ट्रॅप असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!