Pune News: पुण्यात नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं
पुणे : पुण्यात (Pune News) नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात लेखक नामदेव जाधव हे भांडरकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आले. तसेच त्यांना मारहाणदेखील करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आले आहे.
काय म्हणाले होते नामदेवराव जाधव ?
“शरद पवार मराठा आरक्षणावर कधीही स्पष्ट भूमिका घेत नाहीत. जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे येतो तेव्हा मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, यांना आरक्षण दिलं पाहिजे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणतात. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या असं ते कायम का म्हणतात? मराठा समाजाचं म्हणणं आहे जो आमचा हक्क आहे तो आम्हाला द्या. आम्हाला कुणाच्या हक्कांवर गदा आणायची नाही. ज्यावेळी शालिनीताई पाटील या विषयावर आक्रमक झाल्या होत्या तेव्हा शरद पवारांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
https://twitter.com/Topnewsmarathi/status/1725851430953607335
मराठा आरक्षणाला सर्वात मोठा तात्विक, वैचारिक आणि कायदेशीर विरोध शरद पवारांनी केला. आमचं दुर्दैव हे आहे की शरद पवारांनी मराठा म्हणून सगळीकडे मिरवलं आणि मराठ्यांचीच जिरवली. इंग्रजी वर्तमान पत्रांमध्ये जेव्हा बातम्या येत तेव्हा स्ट्राँग मराठा मॅन असे मथळे यायचे. दिल्लीत मराठा म्हणून मिरवायचं आणि महाराष्ट्रात मराठा म्हणून मराठ्यांची जिरवायची हे दुटप्पी वागणं आहे. व्ही. पी. सिंग यांना मंडल आयोगाचं श्रेय जाणार होतं त्याआधी घाईने हा निर्णय शरद पवारांनी घेतला आणि मराठ्यांचं नुकसान केलं. ” असा आरोप नामदेवराव जाधव यांनी केला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Junnar Accident : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा जुन्नरमध्ये भीषण अपघात
Caste Certificate : 45 दिवसांत मिळेल जात प्रमाणपत्र; ‘या’ कागदपत्रांसह करा अर्ज
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून… मनोज जरांगेचा मोठा आरोप
