पुणे : पुण्यातील जुन्नरमधून अपघाताची (Junnar Accident) एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. वडज धरणाच्या कॅनलमध्ये उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक जणाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सतिष चव्हाण असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
कसा घडला अपघात?
जुन्नर तालुक्यातील वडज धरणाच्या कॅनलमध्ये उसाची वाहतूक करणाऱ्या टॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन एका ऊस कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सतिष चव्हाण असे अपघातात मृत्यू झालेल्या उसतोड कामगाराचे नाव आहे तर योगेश पवार आणि गोपाळ राठोड हे दोघे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
विघ्नहर साखर कारखान्यांकडे ऊस भरुन जात असताना हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याची तक्रार जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. जुन्नर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Tiger Viral Video : चक्क एक माकड पडले 2 वाघांवर भारी; वाघांनी घटनास्थळावरून ठोकली धूम
Milk : दुध दर प्रश्नी हस्तक्षेप करा,अन्यथा आंदोलन करू; किसान सभेचा दुग्धविकास विभागाला इशारा
Caste Certificate : 45 दिवसांत मिळेल जात प्रमाणपत्र; ‘या’ कागदपत्रांसह करा अर्ज