Viral Video

Viral Video : अचानक अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या

452 0

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे एक मोठी दुर्घटना (Viral Video) घडली आहे. कुल्लूच्या आनी उपमंडल येथे (Viral Video) भुस्खलन झालं आहे. या भुस्खलनात एकापाठोपाठ एक अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. पत्त्याच्या बंगल्यासारख्या या इमारती कोसळल्या आहेत. आतापर्यंत 7 इमारती कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत असंख्य मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी वेगाने बचावकार्य सुरु करण्यात आले. सध्या या दुर्घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

काय घडले नेमके?
कुल्लू जिल्ह्यातील आनी बस स्टँडजवळच ही दुर्घटना घडली आहे. सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली. एकूण 7 इमारती जमीनदोस्त झाल्याचे समजत आहे. आनी बस स्टँडच्या जवळ इमारतींच्या मागे भुस्खलन झालं. त्यामुळे एकाचवेळी अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. या घटनेमुळे आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणात घाबरले आहेत.

खबरदारी वेळीच घेतली म्हणून मोठा अनर्थ टळला
भुस्खलनात जमीनदोस्त झालेल्या इमारतींमध्ये कांगडा को ऑपरेटिव्ह बँक आहे. दुसऱ्या इमारतीत एसबीआय भवन आहे. जुलै महिन्यात प्रचंड पाऊस पडणार असल्याच्या शक्यतेने प्रशासनाने या इमारतीतून या दोन्ही बँका दुसरीकडे हलविल्या होत्या. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!