Viral Video

Viral Video : ‘नु कावला’ गाण्यावर शाळकरी विद्यार्थ्यांनी केला ढासू डान्स; Video पाहून तमन्नादेखील होईल फिदा

357 0

सुपरस्टार रजनीकांतचा जेलर हा चित्रपट आज संपूर्ण देशभरात रिलीज झाला. या चित्रपटामधील ‘नु कावला हे गाणे सध्या सोशल मीडियावर (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर या गाण्यावरचे रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहेत. ‘नु कावला’ या गाण्यावर अभिनेत्री तमन्ना भाटीयाने जबरदस्त डान्स केला आहे. या डान्सची कॉपी करण्यात आता मोठ्यांसह लहान मुलंही मागे नाहीत. अशाचप्रकारे एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही शाळकरी विद्यार्थी मज्जा मस्ती करत ‘नु कावला’ गाण्यावर ढासू डान्स करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांचा हा डान्स पाहून तमन्ना भाटियादेखील फिदा झाल्याशिवाय राहणार आहे.

‘नु कावला’ गाण्यावर विद्यार्थ्यांचा भन्नाट डान्स
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका शाळेच्या मैदानात काही शाळकरी विद्यार्थ्यांचा ग्रुप ‘नु कावला’ या गाण्यावर नाचत आहेत. निळ्या रंगाचा शर्ट आणि तपकिरी रंगाची पँट अशा शालेय गणवेशात हे सर्व विद्यार्थी डान्स करताना दिसत आहेत. या ग्रुपमधील एक गोंडस मुलगा अगदी एनर्जीने प्रत्येक डान्स स्टेप परफेक्ट करताना दिसतोय. यानंतर त्याच्या डान्सच्या स्टेप्स पाहून इतर विद्यार्थी त्या हुबेहुब कॉपी करत आहेत. या मुलांचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

हा व्हिडीओ (@balramrj143) नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट करण्यात आली आहे. पाच दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. विद्यार्थ्यांच्या डान्सचं सर्वत्र कौतुक केले जात आहे. जेलर हा चित्रपट आज संपूर्ण देशभरात रिलीज झाला आहे. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित आणि अनिरुद्ध रविचंदर यांचे संगीत असलेला हा तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधील ‘नु कावला’ ह्या गाण्याने अक्षरशः तरुणाईला वेड लावले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!