मनोरंजनव्हिडिओ

Baipan Bhaari Deva : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला पडली ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची भुरळ!

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं आहे. फक्त महिलाच नाही तर समस्त पुरुष वर्गाने ही या चित्रपटाला (Baipan Bhaari Deva) डोक्यावर घेतलं आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ही या चित्रपटाची भुरळ पडली आहे. सोशल मीडियावर सचिन तेंडुलकर आणि चित्रपटाच्या टीमचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

दिग्दर्शिक केदार शिंदे यांनी स्वतः सचिनसाठी खास शोचं आयोजन केलं होतं. सचिनने नुकतंच त्याच्या पत्नीसह थिएटरमध्ये जाऊन ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर तो भारावून गेला आहे. सचिनने या चित्रपटातील कलाकारांचं कौतुक केलं. ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर सचिनने व्हिडिओ कॉलवर अभिनेत्री दीपा चौधरीशी संवाद साधला. “अभिनंदन…मला चित्रपट खूप आवडला. आपण नक्की भेटू,” असं म्हणत सचिनने दीपाचं कौतुक केलं. त्यांचा हा व्हिडिओ कॉल सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/CvmsHbJtgKT/?utm_source=ig_embed&ig_rid=0e366d9a-913a-4a3e-b23e-f507a465dc6a

सचिननं देखील चित्रपटाचे कौतुक करत म्हटलं की, “बाईपण भारी देवा ही ६ बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. हा मराठी चित्रपट पाहून मला खुप आनंद झाला. माझी आई आणि मावशी हा सिनेमा कधी पाहतायत याची मी वाट बघतोय. शिवाय चित्रपटातील कलाकारांना भेटणे हा एक सुंदर अनुभव होता.” असं ट्विट सचिन तेंडुलकरने केलं आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सचिनसोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जेव्हा क्रिकेटचा “देव”… “बाईपण भारी देवा” सिनेमा पहातो… श्री स्वामी समर्थ महाराज की जय.’ यावेळी चित्रपटाची टीम उपस्थित होती. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर यांनीही सचिन तेंडुलकरसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

मराठी चित्रपटांतील (Baipan Bhaari Deva) सर्वाधक कमाई करणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटानंतर ‘बाईपण भारी देवा’ देखील महाराष्ट्राचा महासिनेमा ठरला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 73.52 कोटी कमावले असून हा चित्रपट केवळ 5 कोटींमध्ये तयार करण्यात आला होता.