Reporter

हवामानाचे लाईव्ह रिपोर्टींग करताना रिपोर्टरने मारली पाण्यात उडी; नवीन चांद नवाबला पाहिले का?

766 0

इस्लामाबाद: एखाद्या प्रसंगाची बातमी देताना रिपोर्टर काय करतील याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका रिपोर्टरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक मध्यमवयीन व्यक्ती ‘लाइव्ह रिपोर्टिंग’ या संकल्पनेला एका नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये अब्दुल रेहमान खान नावाचा एक रिपोर्टर समुद्र किनाऱ्यावर रिपोर्टिंग करत आहे. हवामानाची माहिती देण्याचे काम तो एकदम मजेशीर रित्या करत आहे. समुद्र किती खोल आहे, वातावरण कसं आहे तो ते मजेशीर आणि अतिरंजित पद्धतीने इथे सांगताना दिसत आहे. आश्चर्य म्हणजे जेव्हा तो न डगमगता आपला मायक्रोफोन धरून समुद्रात उडी मारतो आणि मग पोहताना आपलं रिपोर्टींग चालू ठेवतो.

पाण्याच्या आत जाऊन तो ते पाणी किती खोल आहे हेदेखील सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच चांद नवाबची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओ अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

Share This News
error: Content is protected !!