Bribe

Bribe : लाच घेताना पकडल्याने महसूल अधिकाऱ्याने तोंडात कोंबल्या नोटा, Video व्हायरल

743 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये लोकायुक्तांच्या पथकाने एका महसूल अधिकाऱ्याला लाच (Bribe) घेताना रंगेहात पकडले. यानंतर लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याने लाच (Bribe) घेतलेली रक्कम तोंडात कोंबल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यादरम्यान या अधिकाऱ्याच्या तोंडातून नोटा काढण्याचा खूप प्रयत्न केला तरीही त्याने त्या तोंडातून बाहेर काढल्या नाहीत. त्यामुळे त्यांला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जबलपूर लोकायुक्त टीमला बिलहरी हल्का गावात कार्यरत असलेला महसूल अधिकारी गजेंद्र सिंह याने चंदन लोधी यांच्याकडे 5हजारांची लाच मागितल्याची तक्रार मिळाली होती. तक्रारीनंतर लोकायुक्तांच्या पथकाने लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्याची योजना आखली. पण अधिकाऱ्याने लोकायुक्तांच्या पथकाला पाहताच लाचेची रक्कम चक्क तोंडात टाकून चघळायला सुरुवात केली. या अधिकाऱ्याने सध्या लाचेच्या सुमारे ९ नोटा तोंडात ठेवून चघळल्या आहेत.

हॉस्पिटलमध्येही हा अधिकारी तोंडातून पैसे काढायला तयार नव्हता. मात्र खूप प्रयत्न केल्यानंतर त्याच्या तोंडातील नोटा (Bribe) बाहेर काढण्यात यश आलं. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अधिकारी नोटा चघळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या अधिकाऱ्याला लोकायुक्तांच्या पथकाने अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!