Viral Video

Viral Video : “पोरीला सासरी पाठवत नाही जा” म्हणत सासूने जावयाची चपलेने केली धुलाई

3991 0

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ (Viral Video) हसवणारे असतात तर काही व्हिडिओ रडवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये चक्क सासूने आपल्या जावयाची चपलेने धुलाई केली आहे. जावयाला सासरवाडीत खूप मान असतो. पण इथं मात्र वेगळंच दृश्य आहे. जावयाचा पाहुणचार, मान दूर त्याला मारहाण करण्यात आली आहे. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती रस्त्यावर पडला आहे दोन महिला त्याला बेदम चपलेने मारत आहेत. बिच्चारा जावई हात जोडून माफी मागतो आहे. व्यक्तीला मारणारी व्यक्ती त्याची सासू असल्याचं सांगितलं जातं आहे. जावई आपल्या मुलीला खूप त्रास देतो, दारू पितो म्हणून सासूने जावयाला मारहाण केली आहे. या व्हिडीओमध्येही हा व्यक्ती दारु प्यायला असल्याचं दिसत आहे. दोन महिला आणि एक पुरुषही त्या व्यक्तीला जमिनीवर झोपवून मारत आहेत. तो स्वत:चा बचावर करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हे तिघेही त्याला मारत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला असून नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला, कधीचा आहे हे मात्र समजू शकलेले नाही.

Share This News
error: Content is protected !!