Viral Song

Viral Song : “मेरी उमर के बेरोजगारो..” गाण्याने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

490 0

काही महिन्यांपूर्वी यूट्यूबर आनंद आदर्शचं एक गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Song) झालं होतं. कर्ज या चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. या गाण्याचं रीमिक्स करून आनंद आदर्शनं ‘मेरी उमर के बेरोजगारो’ हे गाणं तयार केलं होतं. या वर्षी मार्च महिन्यात आलेल्या या गाण्यातं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा हे गाणं व्हायरल होत आहे.

काय आहेत गाण्याचे बोल?
आनंद आदर्शनं या गाण्याचं रीमिक्स करून बेरोजगारीच्या समस्येवरून गाण्याचे शब्द फिरवले होते. ‘मेरी उमर के बेरोजगारो, जाति-धरम के चष्मे उतारो’ असे या गाण्याचे शब्द होते. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या गाण्यातून बेरोजगारी, कमिशन राज, भ्रष्टाचार, तरुणांचा त्रागा या गोष्टी हायलाईट्स करण्यात आल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!