Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा सर्वेक्षणाचा उडाला फज्जा ! चक्क पहिली शिकलेल्या कर्मचाऱ्याकडून होतंय सर्वेक्षण

482 0

अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एकीकडे मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. मात्र या सर्वेक्षणावरुन नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. हे सर्वेक्षण 23 जानेवारी ते 31 जानेवारी या वेळेत पूर्ण करायचं आहे.

सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी महसूल विभागासह महानगरपालिकेची धावपळ सुरू आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडून शहरातील सर्वेक्षणासाठी 816 कर्मचारी सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त केले आहेत. सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेले मोठ्या प्रमाणात प्रगणक चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशिक्षित आहेत. या कर्मचाऱ्यांना वाचता तसेच स्मार्टफोन हाताळता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.नगर शहरातील सर्वेक्षण करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये प्रगनक असलेला कर्मचारी आपल्याला सर्वेक्षण करतात येत नसल्याचं सांगत असून आपण इलेक्ट्रॉनिक मदतनीस असल्याचे सांगत आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडून मराठा सर्वेक्षणाबाबत सुरू असलेला सावळा गोंधळ या व्हायरल व्हिडिओ मुळे समोर आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Akola News : मन हेलावून टाकणारी घटना ! ‘त्या’ एका चुकीमुळे 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Hall Ticket : फी भरली नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; बालहक्क संरक्षण आयोगाकडून शिक्षण आयुक्तांना सूचना

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!