Chakki

तरुणाचा जुगाड ! चक्क बाईकवरच बनवले पिठाच्या गिरणीचे मशीन (Video)

281 0

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आतापर्यंत लोकांनी जुगाड केलेले अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाईकवरती (bike trending video) पिठाची मशीन (Atta Chakki Machine) घेऊन फिरत आहे. काही लोकांनी आतापर्यंत हेलिकॉप्टर तयार केलं आहे. तर काही लोकांनी घरी इलेक्ट्रीक बाईक तयार केल्याचे तुम्ही पाहिले असेल.

आयएएस अधिकारी अवनीश शरण (IAS officer Awanish Sharan) यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ त्यांना त्यांच्या आईने पाठवला आहे. जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती चांगलाचं व्हायरल झाला आहे. यामध्ये मशीन कशापद्धतीने काम करीत आहे हे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती बाईकवरती असलेल्या मशीनसोबत उभी आहे. ज्या पद्धतीने हा व्हिडीओ पुढे जात आहे. त्यावेळी ती व्यक्ती त्या मशीनमध्ये मुठभरून धान्य टाकत आहे. काहीवेळात त्या मशीनमधून पीठ बाहेर येताना दिसत आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओवर लोकांनी चांगल्या प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. नवीन टेक्नॉलॉजी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर नवीन जुगाड लोकांना देखील आवडला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!