Love Story

Love Story : अचानक विमानतळावर 78 वर्षांच्या आजोबांना आपल्या शाळेतील क्रश दिसताच त्यांनी उचलले ‘हे’ पाऊल

842 0

बालपणी शेजारी राहणारी असो किंवा शाळा असो किंवा कॉलेज असो प्रत्येकाची कोणी ना कोणी क्रश (Love Story) नक्कीच असते. यानंतर जसजसे लोक मोठे होतात तसे त्यांचे क्रशदेखील (Love Story) बदलत असतात. मात्र काही लोक असेही असतात जे पहिलं क्रश मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवतात. त्या व्यक्तीच्या गोड आठवणी ते अधून मधून काढत असतात. सध्या सोशल मीडियावर एका आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये या आजोबांच्या समोर अचानक त्यांची बालपणीची क्रश समोर येते आणि मग ते आजोबा तिला प्रपोज करतात. सध्या या लव्ह स्टोरीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय घडले नेमके?
78 वर्षांच्या थॉमस मॅकमीकिन ज्यावेळी शाळेत होते तेव्हा नैन्सी गैम्बेल या बालमैत्रीणीच्या प्रेमात पडले होते. शाळेतील प्रेम हळूहळू वाढतं होतं. शाळा संपली आणि सुरु झालं कॉलेज लाइफ…कॉलेज वेगवेगळे पण ते अधून मधून भेटायचे आणि सुंदर क्षण एकत्र घ्यालवायचे. पण शाळेतील हे प्रेम काही लग्नबंधनात अडकलं नाही. दोघांचे लग्न वेगवेगळ्या व्यक्तीशी झालं. मात्र थॉमस मॅकमीकिन यांच्या मनाच्या कोपऱ्यात आजही ती होती.

दिवसे पुढे जात होते. ते दोघेही आपल्या संसारातील जबाबदारी अतिशय योगरित्या सांभाळत होते. आता थॉमस यांचं वय 78 झालं होतं. त्यांच्या बायकोचं निधन झालं. काही दिवसांनी त्यांना कळलं नैन्सीचे पतीचंही निधन झालं. आता मात्र त्यांना वाटलं आपल्या पहिल्या प्रेमासोबत (Love Story) पुढील आयुष्य घालवायला पाहिजे. मग काय आजोबा थॉमस एकद फिल्मी स्टाइल आपल्या पहिल्या प्रेमाला लग्नाच्या मागणी घालण्यासाठी विमानतळावर पोहोचले. या आजोबानी गुडघ्यावर बसून नैन्सीला फिल्मी स्टाईलने प्रपोज केले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आजोबांनी इतक्या सुंदररित्या आजीला लग्नाची मागणी घातली की, आजी लग्नाला नाही म्हणून शकली नाही. हे लव्हबर्ड लवकरच लग्न करुन लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!