मनोरंजनव्हिडिओ

Kangana Ranaut : ”स्त्रिया काय वॉशिंग मशीन आहेत का?” कंगनाचा ‘तो’ Video व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री कंगनासाठी (Kangana Ranaut) हे वर्ष खूप महत्त्वाचे आहे कारण यावर्षी तिचे ३ मोठे चित्रपट येणार आहेत. तिचे Emergency, Chandramukhi 2 आणि Tejas हे मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ती (Kangana Ranaut) नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल तिच्या चाहत्यावर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत आहे.

कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. त्यामुळे तिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यादरम्यान तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काहींनी तिचे कौतुक केले आहे.ती नेमकी या व्हिडिओमध्ये काय म्हणाली चला पाहुयात….

https://www.instagram.com/reel/CvGwqKssexV/?utm_source=ig_embed&ig_rid=c7795a74-504f-49dc-a3a1-6c0d29832eec

सध्या तिचा एक जुना इंटरव्ह्यू मधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती असं म्हणते आहे की, ”स्त्रिया या वॉशिंग मशीन आहेत का? ज्यांना वापरले जाते.” तेव्हाही तिच्या या वक्तव्यावरून खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा या तिच्या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. यात ती म्हणते की, ”जेव्हा एक रिलेशनशिप हे दोघांच्या सहमतीनं असतं तेव्हा प्रत्येकवेळाला असं का होतं की स्त्रियाच या वापरल्या जातात आणि पुरूष हे कायमच मज्जा करतात? हे असं होतंच का? स्त्री ही काय वॉशिंग मशीन आहे का? याला नक्की काय अर्थ आहे? जर एक रिलेशनशिप हे दोघांच्या सहमतीनं सुरू आहे. त्यांच्यात प्रेम आहे तर जर पुरूष फक्त मजा घेऊ शकतो तर स्त्री का नाही?”सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसतो आहे.