Viral Video

Viral Video : लग्नात बेभान होऊन नाचत होती महिला; तेवढयात ‘तो’ आला आणि….

540 0

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत असतात. काही व्हिडिओ (Viral Video) एवढे मजेशीर असतात कि ते पाहिल्यावर तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर लग्नाच्या वरातीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एका महिला आणि एक पुरुष बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये हशा पिकला आहे.

काय आहे नेमके व्हिडिओमध्ये?
यामध्ये एक पुरुष व एक महिला वरातीत नाचताना दिसत आहे. दोघांच्या एकापेक्षा एक मूव्हज व रोमँटिक केमिस्ट्री वरातीतील अन्य वर्हाड्यांना सुद्धा आवडल्याचे दिसतेय. ते सुद्धा सगळे या दोघांना आपल्याच धुंदीत नाचताना पाहून आनंद घेत आहेत. पण अचानक या जोड्यातील पुरुषाला काय सुचतं आणि तो त्या महिलेला उचलून घ्यायला जातो. यानंतर साडी नेसलेली ही महिला तोल न सावरू शकल्याने थेट जमिनीवरच कोसळते.

हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. ” मित्रांनो लग्न कितीही जवळचं असुदे असे जास्त उत्साही होऊ नका” असे लिहिले आहे. काहींनी तर फक्त “काय गरज होती” असा प्रश्न या जोडप्याला विचारला आहे. काहींनी कमेंट करताना या दोघांच्या उत्साहाचे व त्याहूनही ऊर्जेचे कौतुक केले आहे.

Share This News
error: Content is protected !!