Viral Video

Viral Video : कावड यात्रेमध्ये चक्क विषारी सापाची निघाली मिरवणूक

721 0

हिंगोली : हिंगोलीमधून एक धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. साप म्हटलं तरी अंगावर आपल्या काटा येतो प्रत्यक्षात जर समोर आला तर भंबेरी उडाल्याशिवाय राहात नाही. अशातच चक्क एका गावात विषारी नागाची मिरवणूक काढण्यात आली आहे. ही मिरवणूक साधी नव्हती तर नागाला घेऊन नृत्य करत ही मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक राज्यात आणि सोशल मीडियावर मोठा चर्चेचा विषय बनली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
हिंगोलीमध्ये एका कावड यात्रेमध्ये तरूणांनी कावडीवर चक्क विषारी नाग ठेवून मिरवणूक काढली. काही तरुणांनी याचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर देखील व्हायरल केले आहेत. हा धक्कादायक प्रकार डिग्रस कऱ्हाळे या गावामध्ये घडला आहे.

गांगलवाडी येथील सिद्धनाथ महादेव मंदिराला कावड यात्रा निघाली. या कावड यात्रेमध्ये सहभागी तरुणांनी कावडीवर चक्क विषारी नाग ठेवून त्याची मिरवणूक काढल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडीओमध्ये पाहू शकता नाग फणा काढल्या स्थितीमध्ये दिसत आहे. नागासमोर काही तरुण नाचताना दिसत आहेत.

Share This News
error: Content is protected !!