Viral Video

Viral Video : बेडरूममध्ये लेक बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत असताना; अचानक वडील आले अन् मग…

851 0

सध्या सोशल मीडियावर एंक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये काही हसवणारे असतात तर काही धक्कादायक असतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एक तरुण अंडरवियरवर बाल्कनीमधून चादरीच्या दोरीच्या सहाय्याने खाली उतरताना दिसत आहे. एक व्यक्ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्या व्यक्तीला एक तरुणी विरोध करताना दिसतं आहे.

काय आहे नेमका प्रकार ?
पालक घरी नाही म्हणून तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलवलं. ते दोघे बेडरूममध्ये रोमान्स करत असताना अचानक तरुणीचे वडील घरी आले. त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडताच लेकीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला नको त्या अवस्थेमध्ये पाहतात. यानंतर त्यांची तळमस्तकाली आग डोक्यात जाते आणि ते त्या तरुणाला मारण्यासाठी धावतात. वडिलांच्या तावडीतून निसटण्यासाठी तो तरुण अंडरवेअरवरच बाल्कनीतून एक लांब चादरीच्या मदतीने पळण्याचा प्रयत्न करतो. तो व्यक्ती तरुणाला पकडण्यासाठी धडपड करत असताना तरुणी वडिलांना रोखण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

यानंतर ती तरुणी त्या तरुणाचे कपडे बाल्कनीतून खाली फेकते. तो तरुण खाली उतर असताना त्याला अजून एक धक्का बसतो. खालच्या माळ्यावरील घराच्या बाल्कनीतून त्या तरुणीची आई अचानक झाडू घेऊन येते आणि त्या तरुणाला धो धो मारायला सुरुवात करते. सध्या हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News
error: Content is protected !!