Gautami Patil Video : डान्सर गौतमी पाटीलचा झाडामागील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
मुंबई : सबसे कातील गौतमी पाटील.. गौतमी पाटील (Gautami Patil Video) आणि वाद हे समीकरणच बनलं आहे. गौतमी पाटीलचा ज्या ठिकाणी कार्यक्रम असतो त्या ठिकाणी काहीतरी राडा नक्कीच होत असतो. सोशल मीडियावर गौतमीचा (Gautami Patil Video) खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिची क्रेझ लोकांमध्ये अजूनही आहे. तिच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नुकताच तिने इंन्स्टाग्रामवर 1 मिलीयन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
गौतमी केवळ इंटरनेटवरच नाही तर डान्सच्या जगातही एक प्रसिद्ध नाव आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी गौतमी यावेळी पुन्हा एकदा एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. ती नेहमी तिचे रिल्स तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये गौतमी झाडामागे डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CvjM1yAugZD/?utm_source=ig_embed&ig_rid=fad2948f-768f-4e74-8a2b-e5f0d345866d
दरम्यान गौतमी (Gautami Patil Video) ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना आहे. ती अनेक कार्यक्रमांमध्ये लाइव्ह परफॉर्मन्स देत असते. राजकीय कार्यक्रम असो किंवा वाढदिवसाची पार्टी गौतमीला आमंत्रणं येतातच. गौतमीच्या एका महिन्यातील सगळ्या तारख्या फुल्ल असतात. कार्यक्रमांच्या घेऊ तितक्या सुपाऱ्या कमी आहे, अशी अवस्था गौतमीची झाली आहे. यामुळेच ती तिच्या प्रत्येक परफॉर्मन्ससाठी भरमसाठ रक्कम घेते. एका रिपोर्टनुसार ती एका डान्स परफॉर्मन्ससाठी 1 ते 2 लाख रुपये घेते.
