Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल

857 0

नवी मुंबई : नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ (Suicide) उडाली आहे. यामध्ये एका तरुणीने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. फ्लाय ओव्हरवरून तरुणीने पाण्यात उडी घेतली. हा संपूर्ण व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. ही तरुणी फ्लाय ओव्हरवरवरून उडी मारण्याच्या तयारीत असताना तीच्या बचावासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तिने कोणाचंही न ऐकता थेट पाण्यात उडी मारली.

काय घडले नेमके?
नवी मुंबईतील तळोजा परिसरात ही घटना घडली आहे. तळोजा फेज एक आणि फेज दोनला जोडणाऱ्या फ्लाय ओव्हरवरून या तरुणीने आत्महत्येच्या उद्देशाने पाण्यात उडी मारली. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. प्रेम प्रकरणातून तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

या तरुणीने पाण्यात उडी मारताच काही नागरिकांनी तातडीने पाण्यात उडी मारून तिचा जीव वाचवला आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारला अटक ! हा विठ्ठल शेलार नेमका आहे तरी कोण?

Munnawar Rana : लोकप्रिय शायर मुन्नावर राणा यांचं निधन

Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड होणार आहे’; अज्ञात व्यक्तीने केला नियंत्रण कक्षाला फोन

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

Rohit Sharma : रोहित शर्मा मैदानात उतरताच करणार ‘हा’ मोठा विश्वविक्रम

Milind Deora : मिलिंद देवरांसोबत ‘या’ पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Viral Video : धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारत अन् अंगावर ब्लँकेट घेत जोडप्याने केले नको ते चाळे

Pune News : खुशखबर ! अष्टविनायक दर्शनासाठी आता एसटीची विशेष सेवा

Milind Deora : ‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Sharad Mohol : मोहोळचा गेम झालाय, मास्टरमाईंडला सांगा; हत्येनंतर आरोपींनी ‘या’ सरकारी कर्मचाऱ्याला केला कॉल

Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!