Metro Viral Video

भर मेट्रोत कपलचे कडाक्याचे भांडण; भांडणाचे कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

765 0

नवी दिल्ली : अनेक लोक दैनंदिन जीवनात मेट्रोने प्रवास करत असतात. यामध्ये अनेक प्रवाशांमध्ये जागेवरुन किंवा इतर कारणावरुन भांडणं होताना आपण पाहत असतो. सध्या मेट्रो अलीकडच्या काळात एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मेट्रोमध्ये अनेक विचित्र प्रकार घडताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर मेट्रोमधील कपलच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
एक कपल मेट्रोमध्ये प्रवास करत होतं. मात्र प्रवासादरम्यान दोघांचंही कडाक्याचं भांडण सुरु होतं. एवढंच नाही तर दोघेही एकमेकांवर हात उचलतात. त्यांच्या हा तमाशा मेट्रोतील मंडळी निवांतपणे पाहत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगा मुलगी मेट्रोने प्रवास करत आहे. मुलीच्या हातात खरेदी केलेले कपडे दिसत आहे. ती मुलाला खरेदी केलेल्या ड्रेसची किंमत सांगत आहे. मुलगी म्हणते हा ड्रेस 1000 रुपयांचा आहे. तर मुलगा म्हणतो हा तू 150 ला घेतला असशील. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची होताना दिसत आहे.

हा वाद पुढे खूप वाढतो. मुलगी खूप चिडते आणि मुलाला चापट मारते. एकदा नव्हे तर ती दोन तीन वेळेस त्याला मारते. यावर मुलगाही संतापतो आणि तिला मारतो. मुला मुलीचं हे भांडण मेट्रोतील सर्वजण आरामशीर बघताना दिसत आहे. 49 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!