Amruta Fadnavis : PM मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांनी गायले खास गुजराती भाषेत गाणं
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 73 वा वाढदिवस नुकताच पार पडला. यानिमित्ताने त्यांच्यावर सर्व स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी खास गाण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे गुजराती भाषेत त्यांनी हे गाणं गायल आहे. अमृता फडणवीस यांचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी गुजराती गाण्याची व्हिडिओ क्लिक शेअर केली आहे. हे गाणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांनी गुजराती भाषेतील हे गाणं गायले आहे. 2 मिनीट 11 सेकंदाचे हे गाण आहे.या गाण्याला प्रसिद्ध गायक आणि संगीतकार रुपकुमार राठोड यांनी संगीत दिलं आहे.
आधुनिक भारत के शिल्पकार हमारे प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ ! उन्हीं की लिखी कविता ‘रमता राम अकेला’ को गाकर महसूस हुआ की अकेले चलने में भी एक अलग आध्यात्मिकता हैं , एक अलग ही आनंद हैं और देश की सेवा में ही संतोष हैं …..!#nrendramodibirthday… pic.twitter.com/Wbrxv9hD81
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 17, 2023
हा व्हिडिओ शेअर करताना अमृता फडणवीस यांनी त्याला चांगले कॅप्शनदेखील दिले आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रचलेली कविता ‘रमता राम अकेला’ सादर करताना विलक्षण अनुभव आला. एकटं चालण्यातही वेगळीच आध्यात्मिकता आहे. यातून वेगळाच आनंद मिळतो. देश सेवेतच समाधान आहे असे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे.
