TOP NEWS MARATHI : आंबेडकरी चळवळीच्या प्रा. अंधारे यांनी शिवबंधन का बांधले ? ‘समोरासमोर’मध्ये प्रा. सुषमा अंधारे (Video)

542 0

TOP NEWS MARATHI : फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्राध्यापिका सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजपमध्ये सामील झाले, मात्र आता सुषमाताई अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिक शक्ती – भीम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे .

दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवल्या… राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक असलेल्या अंधारे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचार सभेमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ,उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरेंवर अत्यंत गंभीर अशा टीका केल्या होत्या. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयानंतर त्यांच्या या भाषणांचे व्हिडिओ चर्चेत आले. आंबेडकरी चळवळीच्या प्राध्यापिका अंधारे यांनी शिवबंधन का बांधले ? अशा अनेक सडेतोड प्रश्नांसह प्राध्यापिका सुषमा अंधारे यांची थेट मुलाखत…

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!