CRIME PUNE : भिडे पुलाजवळ युवकाची हत्या

549 0

पुणे : पुण्यात आज एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. नदीपात्रामध्ये 35 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास केल्यानंतर ही व्यक्ती गणेश कदम असून या युवकाच्या नातेवाईकांनीच त्याच्या मृतदेहाची ओळख पटवून दिली असल्याचे समजते .

दरम्यान या युवकाची हत्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार पूर्ववैमानस्यातून ही हत्या करण्यात आली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अधिक तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!