Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाचे 300 फूट उचं टॉवरवर चढून आमरण उपोषण

946 0

छत्रपती संभाजीनगर : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. ही मुदत आज संपली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी ते अधिक कडक उपोषण करणार आहे, अन्न, पाणी आणि कुठलीही वैद्यकीय मदत घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यांनी मराठी बांधवांना देखील साखळी उपोषण करण्याचे आवाहन केले आहे.

जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला आता राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राज्यातील अनेक गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दरम्यान मराठी समाजाच्या आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तरुणानं एक आगळं वेगळं आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

हा तरुण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेकटा गावचा रहिवासी आहे. या तरुणानं तीनशे फूट उंच मोबाईलच्या टॉवरवर चढून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. ’ मी सुधाकर विश्वनाथ शिंदे 300 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून बेमुदत अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आता जोपर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाचा जीआर निघत नाही, तोपर्यंत मी माघार घेणार नाही ‘असं हा तरुण व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. आता मराठा आरक्षणावर सरकारकडून काही तोडगा काढण्यात येतोय का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!