फोन घ्यायला गेली अन पाचव्या मजल्यावरून पडली, पुण्यात बिल्डरच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

36430 0

सासवड येथील बांधकाम व्यावसायिक सुनील नाना जगताप यांची २१ वर्षीय मुलगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने तिचा दुर्देवी अंत झाला. या घटनेने जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अनुष्का जगताप (वय २१ वर्ष) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील जगताप हे सासवड मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. २ एप्रिल रोजी ते आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्या नवीन बांधलेल्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत अनुष्का देखील गेली होती. इमारत पाहात असताना फोन आला म्हणून ती गडबडीत खाली येत असताना पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडली. गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

Share This News
error: Content is protected !!