Breaking News

युवा उद्योजक पुनीत बालन यांना सैन्य दलाकडून उत्कृष्ट प्रमाणपत्र उत्तर कमानचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र यांच्या हस्ते प्रदान

468 0

पुणे : भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह सामाजिक कार्यालयाबरोबरच राष्ट्र उभारणातील योगदानाबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांना भारतीय सैन्य दलाच्या उत्तर कमान प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

पुनीत बालन ग्रुप आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून पुनीत बालन हे देशभर सामाजिक उपक्रम राबवत आहेत. प्रामुख्याने
काश्मीर खोऱ्यात त्यांनी इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कराकडून चालविण्यात येत असलेल्या दहा शाळा चालविन्यास घेतल्या आहेत. बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पेहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेगम, व्हेन, घुरेस या अतिरेक्यांचा सर्वांत जास्त धोका (हाय मिलेटिन्स) असलेल्या भागात या सर्व शाळा आहेत.

या शिवाय बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेल्या डगर स्कुलला तांत्रिक, शैक्षणिक आणि आर्थिक मदत केली जात आहे. काश्मीर खोऱ्यातील आफरीन हैदर (तायक्वांदो), सायकलपट्टू मोहोम्मद सलीम, उमर सय्यद (खो खो) अश्या अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविण्यासाठी पुनित बालन ग्रुपच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते आहे. त्याच बरोबर प्रजासत्ताक दिनी अतिरेक्यांचा सर्वात जास्त धोका असलेल्या शोपियान मध्ये सर्वांत 150 फुट उंचीचा तिरंगा ध्वजही उभारला आहे. त्यांच्या या राष्ट्र उभारणीसाठी अतुलनीय कामगिरीची दखल घेऊन भारतीय सैन्य दलाच्या उत्तर कमानकडुन उदमपूर येथील कार्यालयात पुनीत बालन यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले.

भारतीय सैन्य दलासाठी नवीन कश्मीर घडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे माझे प्रयत्न आहेत. माझ्या या कामांची दखल घेऊन हे काम करताना सैन्य दलाकडून मिळालेले प्रशस्तीपत्रक निश्चितपणे माझे मनोबल वाढविणारे आहे.
– पुनीत बालन, अध्यक्ष, इंद्राणी बालन फाऊंडेशन व पुनीत बालन ग्रुप.

Share This News
error: Content is protected !!