पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहात नक्की घडतंय तरी काय ? असाच प्रश्न आता उपस्थित होतो आहे. कारण काही दिवसांपूर्वीच कैद्यांमध्ये दगडफेकीचे घटना घडली होती. आणि आता थेट एका कायद्याने दुसऱ्या कायद्यावर पत्र्यान वार करून त्याला जखमी केले.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बंदी सुरेश दयाळू याने लोखंडी पत्राच्या सहाय्याने बंदी नाना गायकवाड याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये नाना गायकवाड यांच्या गालावर गंभीर दुखापत झाली आहे. आज सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
बंदी सुरेश दयाळू याने कोणतेही कारण नसताना नानासाहेब गायकवाड याच्यावर हा हल्ला केला असल्याचं सांगितलं जाते आहे. यानंतर पोलिसांनी त्यास पकडून खोलीमध्ये पुन्हा डांबून ठेवलं, आणि जखमी नानासाहेब गायकवाड यास उपचारासाठी कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. बंदी सुरेश बळीराम दयाळू याच्या विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.