विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेदरम्यान झेरॉक्स दुकाने राहणार बंद; कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम !

356 0

लवकरच दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दरम्यान कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी राज्य मंडळांना एक विशेष मोहीम आखली असून बोर्ड परीक्षेदरम्यान केंद्रापासून 100 मीटर अंतरापर्यंत असणाऱ्या झेरॉक्स दुकानांना बंद ठेवण्यात येणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यातील एक भरारी पथक असणार असून तालुक्यांमध्ये केंद्राची संख्या जास्त असल्यास एक पेक्षा अधिक भरारी पथक दहावी बारावी बोर्ड परीक्षा केंद्रावर जातील.

परीक्षा काळात झेरॉक्स सेंटरवर विद्यार्थ्यांचा घोळका असतो. झेरॉक्स सेंटर मधून मिनी कॉपी पुरवल्या जात असून कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रातील शंभर मीटर पर्यंतच्या परिसरात असणारे झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून 144 कलम सुद्धा लागू करण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!