CRIME NEWS : महिलांनी हे वाचावेचं ; Road Romeo ने केला विनयभंगाचा प्रयत्न ; स्वरक्षणासाठी तिने घेतला नराधमाच्या गालाचा जबर चावा , पुढे घडले असे काही…

851 0

ठाणे : एक अल्पवयीन मुलगी दिनांक गुरुवारी ११ तारखेला सकाळी साडेसहाच्या सुमारास घोडबंदर रोड, लॉ्कीम कंपनीच्या समोरील स्काय वॉक वरून आरमॉलच्या दिशेने जात असताना एका रोड रोमिओने तिला जबरदस्तीने पकडून तिचा विनयभंग केला आहे . या घटनेतील मुलीने प्रसंगावधान राखून त्या नराधमाच्या गालाचा जबर चव घेतला आणि तिथून पळ काढला आहे .

या प्रकरणाची दखल प्रसार माध्यमानी घेतल्यानंतर या घटनेची माहिती सर्वत्र प्रसिद्ध झाली. या घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त डॉ. विनायकुमार राठोड, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे, चितळसर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भिलारे व पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

या आरोपीला गुन्हा करताना अल्पवयीन मुलीव्यतिरिक्त कोणीही साक्षीदार नव्हते, आरोपीचे वर्णन नाव पत्ता सुद्धा माहित नव्हता त्यामुळे आरोपीस शोधण्याचा पोलिसांसमोर मोठा प्रश्न होता, पण पोलीस पथकाने अथक प्रयत्न करून, गुप्त बातमीदार, तांत्रिक तपास, वेगवेगळ्या ठिकाणचे सुमारे 35 ते 40 सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासून, तसेच आरोपीची शरीरयष्टी व त्याची लकब या वरून शोध घेऊन 32 वर्षीय दिनेश बाकेलाल गौड यास अटक करण्यात आली आहे .

या आरोपीने अजून इतर कुठल्या महिले बाबत असे कृत्य केले आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत, तसेच या स्काय वाॅकवर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून टीएमसी प्रशासन व पोलीस कर्मचारी यांच्या तर्फे या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!