जलसमाधी आंदोलन होणार? रविकांत तुपकरांना मुंबई पोलिसांची नोटीस; शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमाने संघटना आक्रमक

271 0

मुंबई : शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमाने संघटना आक्रमक झाली असून, जलसमाधी आंदोलनासाठी रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना सोबत घेऊन रवाना झाले आहेत. सोयाबीनला साडेबारा हजार रुपयांचा दर मिळावा आणि कापसाला साडेआठ हजारांचा दर मिळावा, या मागण्यांसाठी २४ नोव्हेंबरला अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान मुंबई मरीन ड्राईव्ह पोलिसांनीही रविकात तुपकर यांना नोटीस पाठविली आहे. अरबी समुद्रात आजपर्यंत असे आंदोलन कोणीच केले नाही. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच जलसमाधी घेणे हा गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे आपण हे आंदोलन करू नये, असे या नोटीसमध्ये लिहिले आहे. त्यामुळं उद्या हे आंदोलन कोणतं वळणं घेत हे पाहावं लागेल. उद्यापर्यंत सरकार काही ठोस निर्णय घेते का, याकडं सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!