‘आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु. पोस्ट सांगवी’ ; चंद्रकांत पाटलांना शाई फेकीची धमकी !

331 0

पिंपरी-चिंचवड : पुण्याचे पालकमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा शाईफेक करण्याची धमकी देण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीये. फेसबुक पोस्ट करून अशी धमकी देणाऱ्या दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंद्रकांत पाटील आज सायंकाळी पिंपरी-चिंचवडमधील पवना थडी जत्रेच्या उद्घाटन कार्यक्रमास सांगवी येथे येणार आहेत.

‘आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार ? मुक्काम पोस्ट सांगवी.’ पत्रकार मित्रांनो, आज पण चांगला अँगल घ्या. पवना थडी जत्रा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकण्यात आलीये. ही फेसबुक पोस्ट करणाऱ्या विकास लोले आणि दशरथ पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीये. विकास लोले हा चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचा अध्यक्ष असल्याचा दावा ढोरे यांनी केलाय. चंद्रकांत पाटील आज पवना थडी जत्रेचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे फेसबुक पोस्ट करणाऱ्यांना अद्याप सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही. त्यामुळं आज पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. द्वेष भावना पसरवणं आणि धमकी देणं याबद्दल 152, 505 कलमांतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पवना थडी जत्रेचं उद्घाटन करण्यासाठी चंद्रकांत पाटील जाणार असल्यानं पूर्वी घडलेल्या शाइफेकीच्या घटनेवेळी पोलिसांचा अपुरा बंदोबस्त पाहाता जत्रेच्या ठिकाणी आणि त्यांच्या जाण्याच्या मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!