मुंबईमध्ये 1993 सारखा बॉम्बस्फोट घडवणार ? मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आलेल्या फोनने खळबळ

446 0

मुंबई : पुढच्या दोनच महिन्यात मुंबईत 1993 सारखा स्फोट होणार अशी धमकी देणारा फोन मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आला आहे. या फोन नंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील माहीम, भेंडी बाजार, नागपाडा मध्ये बॉम्बस्फोट होण्याचा दावा या फोन केलेल्या व्यक्तीने केला आहे.

धक्कादायक म्हणजे बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचा या फोनवर सांगण्यात आलं आहे. मुंबई एटीएसने हा फोन ज्या व्यक्तीने केला होता त्या व्यक्तीला ताब्यात देखील घेतले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

एवढेच नाही तर निर्भया बलात्कार प्रकरणासारखी एखादी घटना मुंबईत होणार असल्याच देखील या व्यक्तीने फोनवर सांगितलं. मुंबईत बॉम्बस्फोट, दंगल घडवण्यासाठी दुसऱ्या राज्यातून लोक आले असून या संपूर्ण कट कारस्थानामागे एका काँग्रेसच्या आमदाराचा हात असल्याचेही फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने म्हटलं होतं. मुंबई एटीएसने या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून सखोल तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!