पुणे : आज देशभरातील रिक्षा संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बाईक टॅक्सी विरोधात देशव्यापी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. ओला, टू व्हीलर रॅपिड, उबेर सारख्या ज्या भांडवलदार कंपन्या आहे. यांच्या विरोधात सर्वत्र रोष आहे. पूर्वापार चालत आलेल्या वाहतूक व्यवस्था आहेत, यांना मोडीत काढण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारचे सुरू आहे. गरीब वाहतूकदारांची बाजू पुढे यावी हा असा उद्देश आहे अशी भूमिका आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बाबा कांबळे यांनी मांडली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये जम्मू काश्मीर,तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. बाईक टॅक्सी विरोधात देशव्यापी लढा उभारणार असल्याची घोषणा या पत्रकार परिषदेमध्ये आज करण्यात आली.
यामध्ये ओला उबेर टॅक्सी सेवा बंद झाली पाहिजे व देशभरातील सारथी आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली आहे.