चिंचवड : आज सकाळपासूनच चिंचवड मतदार संघ पोट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ही लढत प्रामुख्याने भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप ,राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये तिरंगी लढत होते आहे.
मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. एकीकडे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच दोन्हीही प्रमुख पक्षांचे उमेदवार आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत.
आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपच्या अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत . त्यामुळे अश्विनी जगताप आपला गड राखण्यात यशस्वी होताना दिसून येत आहेत.
पहिली फेरी
अश्विनी जगताप 4053 मते
नाना काटे 3604,
राहुल कलाटे 1273 मते
—————————————————————————————————–