#BULDHANA : पतीच्या विरुद्ध असलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा म्हणून पत्नीचे शोले स्टाईल आंदोलन, बुलढाण्यात चर्चेचा विषय

702 0

BULDHANA : पतीवर दाखल झालेला खोटा गुन्हा पोलिसांनी मागे घ्या आणि पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी करत महिला थेट टॉवरवर चढली आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातील चाळीस फुट टॉवरवर महिलेने आंदोलन सुरू केलय. हा अनोखा प्रकार घडलाय बुलढाण्यामध्ये…

या महिलेने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्याने पोलिसांसह तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली आहे. जो पर्यंत पतीवरील गुन्हा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका या महिलेने घेतली आहे. पतीवर एका महिलेने छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे.

मेहकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सारंगपूर येथील गावातील एका महिलेने गजानन बोरकर यांच्या विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा खोटा असून माझी तक्रार घेण्यात यावी अशी महिलेची मागणी आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!