पुणे : महापुरुषांचा अवमान या प्रमुख प्रश्नसह महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जाणे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद या प्रश्नांवर बोट ठेवून आज महाविकास आघाडीने मुंबईमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन केलं आहे. या मोर्चासाठी संपूर्ण राज्यभरातून महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील ठोंबरे देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळीच मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाला की, राज्यपालांविरोधात भाजपन काळे झेंडे का दाखवले नाहीत? भाजप फक्त सोयीच राजकारण करत आहे. तर मनसेचे नेते राज ठाकरे हे राज्यपालांच्या विधानावर गप्प का बसले आहेत ? असा सवाल त्यांनी थेट राज ठाकरेंना केला आहे.
मनसेची परिस्थिती म्हणजे काय सोडायचं आणि काय धरायचं अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर ज्यांच्या तोंडून आपोआप जय असा उच्चार निघतो असे लोक देखील राज्यपालांच्या विधानावर काहीच बोलले नाहीत असा टोला रूपाली पाटील ठोंबरे यांनी लगावला आहे.