मुंबई : निवडणूक आयोगामार्फत आज धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कुणाचं हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र सध्यातरी हा निर्णय लांबणीवर पडला असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेवर दावा सांगणारे पुरावे आज दुपारी सादर करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाकडून देखील आत्तापर्यंत प्रबळतेचा दावा सांगणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. तरी हा निर्णय लांबणीवर पडल्याच सध्या तरी दिसून येत आहे.
परंतु आता अशा परिस्थितीमध्ये अंधेरी पोट निवडणुकीमध्ये नक्की काय होऊ शकतं हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारांची अंतिम यादी तयार होईपर्यंत जर हा निर्णय होऊ शकला नाही, तर निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्ह गोठवू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये हि पोट निवडणूक होणार आहे.